ययाति, वि.स.खाडेकर सारांश व समीक्षा

ययाति कादंबरी ही मराठी साहित्याला लाभलेले एक अनमोल रत्न आहे. मराठी साहित्य जगतातले महारथी वि.स.खाडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ययाती कादंबरी अवतरली आहे. १९५९ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती निघाली. तेव्हापासून आजपर्यंत कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. सोबतच कन्नड, मलयाळम यासारख्या भारतीय भाषांबरोबरच विविध परदेशी भाषामधेही ययाति कादंबरीचे भाषांतर जालेले आहे. महाभारतातील आदिपर्वात ययातोपाख्यान म्हणून एक उपाख्यान आहे. या उपाख्यानातील ययाती राजाच्या जीवनकथेवर ययाती कादंबरी आधारलेली आहे. मूळ कथानकाला उपलब्ध इतर साहित्यांच्या निष्कर्षांची जोड देऊन वि.स.खाडेकर यांनी ययातीची नवनिर्मिती साधली आहे. मूळ उपाख्यानामध्ये महाराज ययाती हे हस्तिनापूरचे युवराज आहेत. त्यांचे वडील महाराज नहूश यांना ऋषींनी श्राप दिला आहे.

नहूश महाराज कित्येक वर्षे साप बनून जगतात. त्यांची पुन्हा भेट आपल्याला महाभारताच्या काळात होते जेव्हा ते युधिष्ठिराला भेटतात तेव्हा. नहूश महाराजांनंतर ययाती हस्तिनापूरचा राजा बनतो. त्याचा विवाह दैत्यांचे गुरु, पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या देवयानी हिच्याशी होतो. आणि येथेच देवयानी सोबत शर्मिष्ठेचे आगमन होते. शर्मिष्ठा हि दैत्यराज वृषपर्वा यांची कन्या असते. राजाची कन्या जरी असली तरी वडिलांच्या शब्दासाठी शर्मिष्ठा देवयानीची दासी म्हणून जाते. आणि तेथे गेल्यानंतर ती ययाती महाराजांकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना करते. महाराजही तिच्या सौंदर्याला बघून वाहावत जातात. बरीच वर्षे निघून जातात पण देवयानीला या दरम्यान ययाती आणि शर्मिष्ठा यांच्या नात्याविषयी काहीही भनक नसते. याच काळात देवयानीला दोन तर शर्मिष्ठाला तीन मुले होतात.

देवयानीला कळते कि शर्मिष्ठेला तीन पुत्रांची प्राप्ती हि महाराज ययातीपासूनच झालेली आहे. तेव्हा ती ययातीची तक्रार तिच्या वडिलांकडे करते कि शर्मिष्ठेला तीन आणि मला दोनच मुले झालीत. याचा अर्थ महाराजांचे माझ्यापेक्षा जास्त शर्मिष्ठेवर प्रेम आहे. मुलीचे दुःख पाहून शुक्राचार्य चिडतात व ययातीला वृद्धत्वाचा शाप देतात. पण नंतर ययाती त्यांची क्षमा मागतो तर ते त्या शापावर उ:शाप देतात कि ययाती त्याचे वार्धक्य त्याच्या कोणत्याही मुलाच्या तारुण्यासोबत अदलाबदली करू शकेल. तेव्हा ययाती – महाराज आपल्या पाचही पुत्रांना बोलावतात आणि या अदलाबदली विषयी विचारतात. तर पाचपैकी सर्वात लहान असणारा पुरुच फक्त या अदलाबदालीला तयार होतो. ययाती महाराज वयाची हि अदलाबदली करून संपूर्ण साम्राज्याचा धनी म्हणून पुरुची निवड करतात.

मूळ पुराणानुसार ययाती हजारो वर्ष यौवन उपभोगतो. मात्र नंतर त्याला या सुखोपभोगाचा वीट येतो. शेवटी पुरुला त्याचे यौवन परत करून ययाती वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करतो.ययाती कादंबरी ही पौराणिक कादंबरी आहे. याचा अर्थ असा नव्हे कि पुराणकाळाप्रमाणे या कादंबरीचा आपल्या जीवनाशी काही एक संबंध नाही. संदर्भ जरी पुराणकाळाचा असला तरी ययाती कादंबरी आजच्या भौतिकवादाने भारावलेल्या मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करते.

कादंबरीचे नाव ययाति / yayati
File Type:PDF
Genresकादंबरी
Total Pages:322
Authorविष्णु सखाराम खांडेकर
Languageमराठी
PDF Size:3.67 MB

 ययाति | YAYATI कादंबरी वि.स.खाडेकर PDF Download Link

YAYATI |ययाति कादंबरी वि.स.खाडेकर PDF Download Link

Drop a note if the­ link isn’t functioning properly. Your feedback is much appre­ciated. Visit our site for addition

Note: ययाति पुस्तक Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करा. हे कादंबरी तुम्ही ऑनलाइन ही वाचू शकतात हे ऑप्शन ही उपलब्ध आहे. पुस्तक Download करण्यात काही अडचण येत असेल किंवा लिंक ओपन होत नसेल तर आम्हाला कृपया इ-मेल करुँग सुचना द्या.


READ ONLINE YAYATI ययाति कादंबरी pdf IN marathi

Leave a Comment

Optimized by Optimole